सर्रास चोरट्यांचा चाकण मधे धुमाकूळ,४६ लाखांचा ऐवज चोरीला

चाकण;कंपनीच्या गोडाऊनच्या मागील बाजूला असलेल्या खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्यांनी कंपनीमधून ४५ लाख ९९ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना खेड तालुक्यातील खराबवाडी येथे लुमॅक्स अॅन्सीलरी लिमिटेड कंपनीच्या गोडाऊनमध्ये उघडकीस आली.

शिवानंद रामदास फलके (वय ३५, रा. शिंदे वस्ती, रावेत) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवानंद फलके खराबवाडी येथे असलेल्या लुमॅक्स अॅन्सीलरी लिमिटेड कंपनीच्या गोडाऊनमध्ये काम करतात. अज्ञात चोरट्यांनी २९ जून ते १० जुलै या कालावधीत गोडाऊनच्या पाठीमागील बाजूला असलेल्या खिडकीचे लोखंडी गज कापून आत प्रवेश केला. गोडावूनमधून कॉपर वायर, ब्रास टर्मिनल असे एकूण ४५ लाख ९९ हजार ९६८ रुपयांचा ऐवज चोरून नेला.

पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.