दौंड:प्रतिबंध गुटखा साठा जप्त,२ आरोपी जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

दौंड; शहरातील पाटील चौकात बेकायदा पान मसाला, सुगंधी तंबाखू व गुटखा याची साठवण करून विक्री केल्याप्रकरणी शनिवारी दि. २५ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून २ लाख ४९ हजार रुपयांचा गुटखा तसेच इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सुनील मारुती यादव (रा. दौंड),नरेश हियालदास रोहिडा हे जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार,पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस पथक दौंड पोलीस स्टेशन हद्दीत फरारी आरोपींचा शोध घेत असताना दौंड शहरात बेकायदा गुटख्याचा साठा करून विक्री केली जाते याची माहिती मिळाली. त्यानुसार या पथकाने माहिती मिळालेल्या ठिकाणी शनिवारी छापा टाकला असता, सुनील मारुती यादव हा त्याचेकडील मारुती ओम्नी कारमध्ये (नं. MH 42 H 665) पान मसाला, सुगंधी तंबाखू असा २ लाख ६ हजार रूपये किमतीचा बेकायदा गुटखा ठेवून असल्याचे निदर्शनास आले.

हा माल विक्री करण्याच्या उद्देशाने त्याचे कब्जात बाळगला असून हा माल त्याचा ओळखीचा व्यापारी नरेश हियालदास रोहिडा यांच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यावरून नरेश रोहिडा याच्या गोल्डन जनरल स टोअर्स याठिकाणी जाऊन छापा टाकला असता दुकानातून ४३ हजार रूपये किंमतीचा बेकायदा पान मसाला, सुगंधी तंबाखू साठा असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत कारसह एकूण २ लाख ४९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जप्त केला, याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल पुढील तपासासाठी दौंड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे , सहाय्यक फौजदार महेंद्र गायकवाड , पोलीस हवालदार सचिन गायकवाड, गुरु गायकवाड, सुभाष राऊत, पोलीस नाईक अभिजित एकशिंगे यांच्या पथकाने केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.