कंपाऊंडरला मारहाण करुन रुग्णालयातील रोकड लंपास,३ चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे;पायास जखम झाल्याचा बहाणा करत एका रुग्णालयात जबरी चोरी करण्यात आली. कंपाऊंडरला मारहाण करुन रोकड, औषधे आणि इंजेक्शनही चोरण्यात आले. ही घटना उंड्री येथील इंडस हॉस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी तीन अज्ञात व्यक्तींविरुध्द कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांनी विरोध करताच त्यांच्या डोक्यात खुर्ची फेकून मारली तसेच लोखंडी पाईपने मारहाण केली. फिर्यादीने उपचार घेतल्यावर तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी रुकमाजी राजाभाऊ लवटे (२४,रा.उंड्री चौक) हे रुग्णलयात कंपाऊंडर म्हणून काम करतात. गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास त्यांच्या हॉस्पिटलमध्ये तीन व्यक्ती आल्या. यातील एकाने पायाला जखम झाली आहे, बॅंडेज बांधा असा बहाणा केला. हॉस्पिटलमध्ये इतर कोणी नसल्याचे लक्षात येताच त्यांनी काऊंटरमधील रोख ८ हजार, इंजेक्शन, गोळ्या आणी औषधे जबरदस्तीने घेतले.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मोहिते करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!