व्यावसायात नुकसान झाल अन इसम चढला ७० फुट उंच होर्डिंगवर
हडपसर;व्यावसायात नुकसान झाल्याने आत्महत्या करण्यासाठी एक इसम तब्बल ७० फुट उंच होर्डिंगवर चढला होता. मुझे न्याय नहीं मिलता, मैं यही रहुंगा, मैं जान दे दूंगा असे म्हणून हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. मांजरी स्टड फार्म जवळील रुकारी पेट्रोल पंपाच्या समोरील लोखंडी होर्डीगवर, मांजरी पुणे, येथे शनिवारी (दि.२४) सायंकाळी साडेपाच वाजता हा प्रकार घडला. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ३१ वर्षीय इसमावर (रा. मांजरी) याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार गौतम हाटकर यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक इसम मांजरी, पुणे येथील लोखंडी होर्डीगवर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत आहे. असा कॉल फिर्यादी यांना आला. फिर्यादी यांनी पुणे-सोलापुर रस्त्याच्या बाजुला मांजरी स्टड फार्मच्या समोर असलेल्या मोठ्या लोखंडी होडींगजवळ जाऊन पाहिले असता इसम साठ ते सत्तर फुटाच्या लोखंडी होर्डीगवरती चढलेला होता. व्यवसायामध्ये झालेल्या नुकसानीमुळे हा इसम आत्महत्या करीत असल्याचे त्याने सांगितले. त्याला खाली उतरण्याबाबत विनंती केली असता, त्याने मे नीचे नहीं आऊंगा, जबतक मुझे न्याय नहीं मिलता, मै यही रहुंगा, नहीं तो मै मेरी जान दे दूंगा’.असे बोलू लागला. अखेर त्याला खाली उतरून नोटीस बजावण्यात आली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!