महिलेला दुसर लग्न करण पडलं महागात,महिलेसह ६ नातेवाइकांवर गुन्हा दाखल

पुणे;घटस्फोटाचा अर्ज न्यायालयात प्रलंबित असताना दुसरे लग्न करणाऱ्या महिलेविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेसह तिच्या सहा नातेवाईकांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे. याप्रकरणी एका ३१ वर्षीय पुरुषाने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि २९ वर्षीय महिलेचा कोर्टामध्ये घटस्फोटाचा अर्ज प्रलंबित आहे. हा अर्ज प्रलंबित असतानाही आरोपी महिलेने दुसऱ्याच एका व्यक्तीशी बेकायदेशीरपणे विवाह केला. ही बाब तिच्या घरच्यांना माहिती होती.ते पण तिच्या या लग्नामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे पहिल्या लग्नाच्या घटस्फोटाचा अर्ज प्रलंबित असतानाही दुसरे लग्न करणे यामुळे आरोपी महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास समर्थ पोलिसांनी करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.