केंद्र सरकारचा मोठा निर्णय!EPFO देणार ८.५% व्याज,पहा सविस्तर

कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान EPFO(Employees’ Provident Fund) च्या ६ कोटी खातेधारकांसाठी ४ ते ५ दिवसांमध्ये चांगली बातमी मिळणार आहे. सूत्रांच्या मते, PF अकाउंटमध्ये जुलैच्या शेवटी चांगली रक्कम जमा होऊ शकते. जुलै महिना संपन्याला ५ दिवस बाकी आहेत. EPFO कडून आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी ८.५ टक्के व्याज सब्सक्राइबर्सच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्याला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे.

७ वर्ष खालच्या स्तरावर PF व्याज दर

EPFO ने आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी व्याजदराचे बदल ८.५ टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हा व्याजदर गेल्या 7 वर्षातील सर्वात कमी व्याजदर आहे.

याआधी आर्थिक वर्ष २०१३ मध्ये व्याजदर ८.५ टक्के होता. २०१९ मध्ये ८.६५ टक्के व्याजदर मिळत असे. तर २०१४ मध्ये हाच व्याजदर ८.७५ टक्के इतका होता.

EPF बॅलेंस चेक कसा कराल?

तुमच्या खात्यावर ८.५ टक्के व्याजाचे पैसे कोणत्याही वेळी जमा केले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही बॅलेंन्स चेक करायला हवा. त्यासाठी तुम्ही 7738299899 या नंबरवर SMS करायला हवा. त्याचा फॉर्मॅट EPFOHO UAN ENG असा असेल. तुम्हाला मराठीतून माहिती हवी असल्यास EPFOHO UAN MAR असा SMS करूनही माहिती मागवू शकता.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.