४ टोळक्यानी मिळून घरात घुसून केली वास्तूंची तोडफोड,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड;रात्रीच्या वेळी चार जणांनी मिळून एका व्यक्तीच्या घरात घुसून वस्तूंची तोडफोड केली. त्यानंतर दोघांना बेदम मारहाण केली. घरातील सामान अस्ताव्यस्त टाकून फ्रिज आणि टीव्हीचे नुकसान केले. ही घटना निराधारनगर, भाटनगरसमोर, पिंपरी येथे घडली.

सुरेश भुंगा कांबळे (वय ३६, रा. निराधारनगर, भाटनगर समोर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इरफान शहानवाज शेख, आकाश राजू काळे, बाळा राजू काळे (तिघे रा. पत्राशेड पिंपरी), करण सरोदे (पुर्ण नाव पत्ता नमूद नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी जेवण करून घरी बसले होते. त्यावेळी आरोपी त्यांच्या घरात बेकायदेशीर पणे आले. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. घरातील सामान अस्ताव्यस्त टाकून फ्रीज व टीवी फेकून मोठे नुकसान केले आहे.सादर प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.