अश्लील चित्रपट प्रकरणात राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
अश्लील चित्रपट आरोपप्रकरणी व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई हायकोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राज कुंद्रासह त्याचा सहकारी रायन थार्पलाही अटक झाली होती. त्याचीसुद्धा १४ दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणी १९ जुलै रोजी राज कुंद्राला अटक झाली होती. या प्रकरणात पोलीस कोठडी रद्द करण्यासाठी राज कुंद्राने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. जो कंटेंट पोलीस अश्लील म्हणून दाखवत आहेत तो थेट अश्लील वर्तन नसून एका विशिष्ट इच्छुक वर्गासाठी तयार केलेल्या शॉर्टफिल्म्स आहेत, असा दावा कुंद्राने केला होता.
पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असून त्याची कायदेशीर पूर्वसूचना देण्यात आली नाही. त्यामुळे महानगर दंडाधिकारींनी दिलेला रिमांडही बेकायदेशीर आहे असा दावा कुंद्राने केला होता. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार लावलेले आरोपही चुकीचे असून त्याप्रमाणे कोणतेही कृत्य केलेले नाही, अस बचाव याचिकेत नमूद केलं होत. विशेष म्हणजे जो कथित कंटेंट अश्लील म्हणून पोलिसांकडून दाखवला जात आहे, तो कोणताही थेट अश्लील वर्तन किंवा अश्लील संबंध नाहीत. उलट हा कंटेंट शॉर्टफिल्म्सच्या माध्यमातून दाखविला असून तो त्या मागणीप्रमाणे विशिष्ट इच्छुक लोकांसाठी तयार केलेला आहे, असा दावा यामध्ये केला होता.
कुंद्रा आणि त्याचा साथीदार रायन थार्प यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गुन्हे शाखेने कुंद्राला यामध्ये मुख्य सूत्रधार दाखवले आहे. त्याच्या खात्यात दर दिवशी लाखो रुपये जमा होत होते आणि हॉटशॉट्स अॅप्सच्या माध्यमातून हा प्रकार चालविला जात होता, असे पोलिसांनी सांगितले आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!