मोठ्या फायद्याच्या आमिषाने शेत जमिनीचा व्यवहार पडला महागात,१७ लाखाला घातला गंडा, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
हिंजवडी;मावळ तालुक्यातील ओवळे या गावी जमीन देतो असे सांगून एका दाम्पत्याची साडेसतरा लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी दोघाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना हिंजवडी येथे घडली.
कमलेश लक्ष्मण टिलवानी (वय ४० रा. अंधेरी वेस्ट, मुंबई) यांनी सोमवारी दि. २६ हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किझ्झकुम शब्बीर बाबू उर्फ के शब्बीर बाबू आणि सचिन नाळे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी आपसात मिळून आकर्षक गुंतवणुकीचे आमिष फिर्यादी कमलेश आणि त्यांची पत्नी यशिका यांना दाखवले.त्यांना शेत जमीन प्लॉट खरेदीसाठी साई स्पर्श हा शेत जमीन प्लॉट मावळ तालुक्यातील ओवळे या गावी दाखविला. प्रति चौरस फूट ८१.३३ या दराप्रमाणे या व्यवहारात ३५ लाख रुपये ठरवले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून १७ लाख ५० हजार रुपये रोख व धनादेशाच्या स्वरूपात घेतले. ११ महिन्यात सदरची जमीन प्लॉट करून देतो, असे सांगितले. मात्र अद्याप पर्यंत त्यांना प्लॉट दिला नाही. तसेच फिर्यादी यांनी दिलेले १७ लाख ५० हजार रुपये परत न देता फसवणूक केली.
पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!