किरकोळ वादात पोलीसाने ताणली बंदूक, पोलिसाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे;पैशाच्या कारणावरून एका पोलीस निरीक्षकाने पोलीस ठाण्यातच एका व्यक्तीवर बंदूक ताणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित व्यक्तीने केलेल्या तक्रारीनंतर त्या पोलीस निरीक्षकाविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेश पुराणिक, असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. सध्या ते वाहतूक शाखेत काम करतात. याप्रकरणी कार्तिक रामनिवास ओझा यांनी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी कार्तिक हे घराचे डेकोरेशन करण्याचे काम करतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या घरात इंटेरियर डेकोरेशनचे काम केले होते. काम सुरू करण्याआधी फिर्यादी यांनी पुरानी त्यांना कामाचे कोटेशन दिले आणि नंतर काम करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, ७० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर फिर्यादी यांनी पुरानिक यांच्याकडे पैसे मागितले असता त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. पुराणिक यांनी कामात अनेक त्रुटी काढतात सुरुवातीला दिलेले पैसे फिर्यादीकडे परत मागितले. यासाठी त्यांना कायद्याच्या जाळ्यात अडकवण्याची धमकी देखील दिली.

पुराणिक यांनी कार्तिक यांना आपल्या कार्यालयात कामाची सर्व कागदपत्र घेऊन बोलवले होते. त्या ठिकाणी आल्यानंतर उर्वरित पैसे दिले नाही म्हणून त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. याव्यतिरिक्त पुरानीक यांनी सर्विस रिव्हॉल्व्हर काढून फिर्यादी यांच्या डोक्याला लावली आणि जबरदस्तीने त्यांच्याकडून कागदावर सह्या करून घेतल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या सर्व प्रकारानंतर फिर्यादीच्या बहिणीने पोलिस आयुक्त कार्यालयात तक्रार अर्ज केला होता. समर्थ पोलिस ठाण्यातही दिलेल्या तक्रार अर्जानुसार पुराणिक यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.