पिंपरी चिंचवड:अट्टल चोरट्यांनी गोडाउन मद्ये घातला २ लाखांना गंडा,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड;कुलूप लावून बंद असलेल्या पॉलिथिन पॅकिंग मटेरियल गोडाउनमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. गोडाउनमधून दोन लाखांचे साहित्य चोरून नेले. ही घटना बी ब्लॉक पिंपरी येथील पॉलिथिन पॅकिंग मटेरियल गोडाउनमध्ये घडली.
याबाबत सतपाल प्रेमारामजी तौहर (वय ३२, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पिंपरीमध्ये पॉलिथिन पॅकिंग मटेरियल गोडाउन आहे. हे गोडाउन कुलूप लावून बंद होते.अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. गोडाऊनमधून दोन लाख रुपयांचे पॉलिथिन मटेरियल चोरून नेले. दरम्यान फिर्यादी आजारी असल्याने त्यांनी मंगळवारी याबाबत फिर्याद दिली.
पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!