शिरूर:एटीएम चोरीचा गुन्हा उघड,२.५ लाखांचा मुद्देमाल जप्त,पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी

शिरूर;शिरूर येथील एटीएम चोरीचा गुन्हा पुणे ग्रामीण एलसीबी शाखेने उघडकीस आणला आहे.तसेच ३ आरोपींकडून नगर, औरंगाबाद येथील चोरीच्या ४ मोटरसायकली जप्त करून एकूण ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. २ लाख ५५ हजाराचा एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आकाश उर्फ निलेश अनिल गायकवाड (वय २७ रा.नेवासा, ज्ञानेश्वर मंदिर रोड, ता.नेवासा जि.अहमदनगर) तन्मय उर्फ सोनल संदिप साळवे (वय २१ रा.नेवासाफाटा, मुकींदपूर ता.नेवासा जि.अहमदनगर) अशिष माणिक डुकरे (वय २१ रा.नेवासाफाटा, मुकींदपूर ता.नेवासा जि.अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार,दि.२० जुलै २०२१ रोजी रात्री १२.३० च्या सुमारास पुणे नगर रोड, सरदवाडी ता.शिरूर जि.पुणे येथे असलेले ॲक्सिस बँकचे एटीएम कोणीतरी अज्ञात चोरटयांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला व एटीएमच्या रूममध्ये असणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तसेच एटीएमच्या मशीनचे नुकसान केल्याबाबत धनंजय दशरथ गायकवाड वय २८ वर्ष रा.कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर घडलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले होते. सदर पथकाने आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासणी करून आरोपींची माहिती काढली असता ते अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटा या भागातील असल्याची माहिती समजली. सदर पथकाने अहमदनगर जिल्हयात जाऊन वेशांतर करून त्यांच्या हालचालीवर पाळत ठेवून दिनांक २७ रोजी सादर आरोपी यांनी वाळूंज एमायडीसी येथून पहाटेच्या सुमारास दोन मोटरसायकली चोरून त्या बेलापूर ता.श्रीरामपूर जि.अहमदनगर येथे विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस पथकाला एका मिळाल्याने बेलापूर येथे सापळा रचून ३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी ७ दिवसापूर्वी शिरूर, सरदवाडी येथील एटीएम गॅस स्प्रे च्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केल्याचे सांगून औरंगाबाद वाळूंज एमआयडीसी येथून १ बजाज पल्सर व १ होंडा शाईन तसेच अहमदनगर एमआयडीसी येथून १ होंडा शाइन व तोफखाना येथून १ होंडा पॅशन प्रो अशा एकूण ४ मोटरसायकली चोरी केल्याचेही सांगितले आहे. त्याबाबत औरंगाबाद व अहमदनगर येथील स्टेशनला चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदर चोरीच्या ४ मोटरसायकली किं.रू.२,५५,०००/- (दोन लाख पंचावन्न हजार) च्या तिघे आरोपींकडून जप्त करून त्यांचेकडून औरंगाबाद व अहमदनगर येथील मोटरसायकल चोरीचे ४ व पुणे जिल्ह्यातील एटीएम चोरीचा १ असे एकूण ५ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट, सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, जनार्दन शेळके, राजू मोमीन, अजित भुजबळ, गुरु गायकवाड, सुभाष राऊत, अभिजित एकाशिंगे, काशिनाथ राजापुरे यांनी केलेली आहे.

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.