अट्टल चेन स्नॅचींग करणा-या चोरटयास गुन्हे शाखा युनिट – ६ ने केले मोठ्या शिताफीने केले गजाआड,७ लाख मुद्देमाल जप्त १० गुन्हे उघड

लोणी काळभोर;चेन स्नॅचींग करणा-या चोरटयास गुन्हे शाखा, युनिट – ६ ने मोठ्या शिताफीने अटक करून १० गुन्हे उघडकीस आणले.तसेच आरोपींकडून एकूण ७ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदर घटना कोंढवा परिसरात घडली.

असद उर्फ असदुल्ला माशाअल्ला जाफरी उर्फ इराणी, (वय ४७ रा. पठारे वस्ती, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे)असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस चेन स्नॅचींगच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी चेन स्नॅचींगचे गुन्हे उघडकीस आणणे व चेन स्नॅचींग करणाया आरोपींवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबत आदेशित दिले असताना, बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वटपोर्णिमे दिवशी देवाची उरळी
परिसरामध्ये सोनसाखळी चोरी करणारा चोरटा कोंढवा परिसरामध्ये त्याच्या पत्नीस भेटण्यास येणार आहे.अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे शाखा, युनिट ६ ने सदर ठिकाणी सापळा रचून मोठ्या शिताफीने आरोपीस अटक केले.आरोपींची अधिक चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या एका साथीदारासह केल्याचे उघडकीस आले. नमूद आरोपी व त्याचा साथीदार यांच्याकडून पुणे शहरामध्ये सोनसाखळी चोरीचे एकूण ९ गुन्हे व मोटारसायकल चोरीचा १ गुन्हा असे एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीने गुन्हयातील सोन्याचे दागिने विशाल जगदीश सोनी, रा. कोंढवा, पुणे या सोनारास विकल्याचे सांगितल्याने नमूद सोनारास या गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे. नमूद गुन्हयामध्ये एकूण ७ लाख ६ हजार रु किमतीचा मुद्देमाल त्यामध्ये १४ तोळे सोन्याचे दागिने व गुन्हा करण्याकरिता वापरलेली चोरीची स्प्लेंडर मोटार सायकल पंचनाम्यांतर्गत हस्तगत करण्यात आली आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सह आयुक्त, डॉ. रविंद्र शिसवे, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. अशोक मोराळे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. श्रीनिवास घाडगे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे – २, श्री. लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट- ६ चे पोलीस निरीक्षक, श्री. गणेश माने, सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, अंमलदार मच्छिंद्र वाळके, कानिफनाथ कारखिले, नितीन शिंदे, नितीन मुंढे, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.