सावत्र आई ने मुलीला लावल वेश्या व्यवसायाला,आरोपी महिलेसह ५ आरोपी गजाआड

पिंपरी चिंचवड; पहिल्या पतीपासून झालेल्या आपल्या अल्पवयीन मुलीला आईने वेश्या व्यवसायाला लावल्याचे पोलिसांना आढळून आले. त्याचबरोबर महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेताना तेथे ग्राहकांना गांजाही दिला जात असल्याचे आढळून आले. पिंपरीतील मासुळकर कॉलनीमधील उद्यमनगर येथील एका फ्लॅटवर अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या छाप्यात हा धक्कादायक प्रकार आढळून आला आहे. पोलिसांनी एका महिलेसह ५ जणांना अटक केली आहे.

याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले यांनी पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.अजय नारायण माने (वय २२, रा. उद्यमनगर, मासुळकर कॉलनी, पिंपरी), ओंकार बाळासाहेब कदम (वय २२, रा. करावागज, ता. बारामती), राकेश रामजीलाल चौधरी ऊर्फ सहारान (वय ३२, रा. ट्रान्सपोर्ट नगर, निगडी) आणि मांगीराम सुरतसिंग बुगालिया (वय ३२, रा. निगडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासोबत एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार,अंमली पदार्थ विरोधी पथकाने मासुळकर कॉलनीतील श्रेयस हाईटस येथील एका फ्लॅटवर छापा टाकला. त्यावेळी तेथे दोन महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याचे आढळून आले. हा वेश्या व्यवसाय चालविणार्‍या महिलेने आपल्या पहिल्या पतीपासून असलेल्या अल्पवयीन मुलीकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे दिसून आले. तिच्या या फ्लॅटमध्ये ४७६ ग्रॅम गांजा व विदेशी दारुच्या बाटल्या आढळून आल्या. तसेच राकेश चौधरी आणि मांगीराम बुगालिया हे दोघे पिडित महिलांशी अल्पवयीन मुलीसमोर अश्लिल चाळे करीत असताना आढळून आले. पोलिसांनी या महिलेसह ५ जणांना अटक केली आहे.

पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.