टेम्पो, ट्रॅक्टर, ट्रॉली चोरणारा सर्रास चोरटा गजाआड,गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कामगिरी,१६ लाख मुद्देमाल जप्त

पुणे;पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका सर्रास चोरट्याला गजाआड केले आहे.दुचाकी, टेम्पो, ट्रॅक्टर, ट्रॉली असा एकूण १६ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन,त्याने केलेले चोरीचे ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने ही कारवाई केली.

अमोल उर्फ अंगद प्रभू माळी (वय २४, रा. वाडेबोलाइ, नायरवस्ती, हवेली) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,धावडा वाहन चोरी विरोधी पथकाचे कर्मचारी हडपसर आणि लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी गणेश लोखंडे आणि अमोल सरतापे यांना संबंधित आरोपी विषयी गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार आरोपी अंगद हा हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवरून आला असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशी तो वापरत असलेली दुचाकी चोरीची असल्याचे त्याने कबूल केले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक करून हडपसर येथे त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आणखी काही वाहन चोरी केली असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याने चोरलेली एक दुचाकी, टाटा कंपनीचा पिकप टेम्पो, टाटा कंपनीचा आणखी एक टेम्पो, जॉन डीयर कंपनी चा ट्रॅक्टर आणि न्यू हॉलैंड कंपनीचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली जप्त केली आहे.असा एकूण १६ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कारवाई,पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोलीस कर्मचारी राजेश अभंगे, दिनकर लोखंडे, राजेश लोखंडे, विनायक रामाने, शाकीर खान, मनोज शिंदे, गणेश लोखंडे, शिवाजी जाधव, दत्तात्रेय खरपुडे, अमोल सरतापे यांच्या पथकाने केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.