भरधाव वाहनाच्या वेगात तरुणाचा मृत्यू,वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल

सांगवी;अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना औंध हॉस्पिटलसमोर घडली.

रोहितसिंग गौड (वय २०) असे मृत्यू तरुणाचे नाव आहे. याबाबत मुकेशसिंग शंगरसिंग गौड (वय १९, रा. भोईरवाडी, हिंजवडी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाचा मयत रोहितसिंग बुधवारी पहाटे औंध हॉस्पिटल समोरून जात असताना. त्यावेळी अज्ञात वाहनाने रोहितसिंग याला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रोहितसिंगचा मृत्यू झाला. घटनेची माहिती न देता आरोपी वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला.

पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.