मावळ:एकाच जमिनीचा दोन वेळा व्यवहार करणारी टोळी गजाआड,६ टोळक्यांवर गुन्हा दाखल
मावळ; एकाच जमिनीचा दोन वेळा व्यवहार केला.यामध्ये पहिल्या व्यक्तीकडून ५२ लाख २५ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. हा प्रकार २२ मार्च २०१८ ते २६ मार्च २०२१ या कालावधीत मावळ तालुक्यातील दारुंब्रे येथे घडला.
धनंजय काशीपाटील कलाटे (वय ३७, रा. डांगे चौक, वाकड) यांनी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिताराम गणा आगळे, किरण सिताराम आगळे, प्रियंका किरण आगळे, चंद्रकांत शेलार, मंदा चंद्रकांत शेलार, मच्छिंद्र विजय कोल्लम (सर्व रा. दारुंब्रे, ता. मावळ) दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दारुंब्रे येथील गट नंबर २६ मधील २४ आर जमिनीचे साठेखत आणि २२ मार्च २०१८ रोजी कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यारपत्र फिर्यादी यांच्या नावे करून दिले. त्यापोटी फिर्यादी यांच्याकडून ५२ लाख २५ हजार रूपये आरोपींनी स्वीकारले. या जमिनीबाबत देवीसिंग चितोडीया या व्यक्ती सोबत व्यवहार झाल्याचे आरोपींनी फिर्यादीस त्यांना कल्पना दिली नसून. तसेच २६ मार्च २०२१ रोजी वडगाव मावळ दुय्यम निबंधक कार्यालयात आरोपीने देवीसिंग पन्नीसिंग चितोडिया (रा. दारुंब्रे, ता. मावळ) यांना खरेदीखत करून दिले. या प्रकरणात आरोपींनी फिर्यादी यांची ५२ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली.
पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!