लग्नाचे आमिष दाखवून १५ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक छळ,परप्रांतीय आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
कोंढवा;१५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या मोबाईलवर मेसेज पाठवून तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिचा लैंगिक करणाऱ्या परप्रांतीय तरुणाविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार धीरज शर्मा (वय १९, उत्तरप्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही आरोपीने तिच्या मोबाईलवर मेसेज करून तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करणार आहे असे आमिष दाखवले. आणि तिला तिचे विवस्त्र फोटो पाठवण्यास भाग पाडले. नंतर हे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन तिचा वारंवार लैंगिक छळ केला.दरम्यान पीडित मुलीने घडत असलेला सारा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईने कोंढवा पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी पॉक्सो कलम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पोलिस आरोपीचा तपास घेत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!