फुकटात चिकन घेणं पडल महागात, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड;चिकन घेतल आणि दुकानदाराने पैसे मागितले असता दुकानाची चक्क तोडफोड केली. तसेच दुकानातून १ हजार रुपये जबरदस्तीने चोरून नेले. त्याचबरोबर या ग्राहकाने अन्य ग्राहकांना धमकावले. ही घटना नेहरुनगर पिंपरी येथील बारामती ऍग्रो सुपर चिकन सेंटर मध्ये घडली.

याबाबत महादेव मच्छिंद्र चौबे (वय ३५, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.सुरेश मोहिते (वय ३०, रा. नेहरुनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आरोपी दीपक हा नेहरुनगर पिंपरी येथील बारामती ऍग्रो सुपर चिकन सेंटर मध्ये चिकन खरेदी करण्यासाठी आला. चिकन खरेदी केल्यानंतर दुकानदाराने दीपकला पैसे मागितले. या कारणावरून दीपक याने शिवीगाळ करून फिर्यादी दुकानदाराला मारहाण केली. तसेच दुकानातील सामानाची तोडफोड करून नुकसान केले. चिकन घेण्यासाठी आलेल्या अन्य लोकांना पुढे आल्यास दगडाने मारण्याची धमकी दिली. आरोपी दीपक याने फिर्यादी यांच्या दुकानातील कॅश काऊंटर मधून १००० रूपये जबरदस्तीने चोरून नेले.

पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.