भोसरी:परत एटीएमम वर डल्ला, चोरट्यांना रोकड चोरण्यात अपयश

भोसरी;भोसरी परिसरात गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडले. मात्र चोरट्यांना एटीएममधून रोख रक्कम चोरता आली नाही. ही घटना इंद्रायणीनगर भोसरी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणीनगर भोसरी येथे बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम आहे. या एटीएममध्ये अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडले. मात्र, चोरट्यांना मशीनमधून रोकड चोरता आली नाही. दुपारी तीन वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होउन पुढील तपास सुरू आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे करत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.