अट्टल वाहन चोरटे गजाआड,हडपसर पोलिसांची कामगिरी

पुणे;मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. ३ चोरट्यांनकडून १० मोटारसायकल, एक ऑटो रिक्षा असा ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

महेश लक्ष्मण धुमाळ (वय २३, रा. आंबेगाव, ता. दौंड, जि.पुणे), प्रतिक संदीप काळे (वय २१, रा. वेताळनगर, केडगाव ता. दौंड जि. पुणे), महेश दिलीप जगताप (वय २३, रा. मळईवस्ती, कडेठाण ता. दौंड जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलिसांचे पथक गस्त घालत असताना पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांना संशयित इसम ससाणेनगर परिसारात कॅनॉल पुलावर क्रमांक नसलेल्या एका मोटार सायकलवर थांबला असल्याचे आढळून आले. संशयावरून पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या सोबतचे दोन साथीदार हे मोटार सायकल आणण्यासाठी गेले असल्याचे त्याने सांगितले. त्याची माहिती संशयास्पद वाटल्यामुळे त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन सापळा लावत त्यांना ताब्यात घेतले. यानंतर पुढील तपासात मोटरसायकल बाबत विचारले असता ही मोटरसायकल गोंधळेनगर येथून चोरी केली असून त्यावरून ट्रिपल सीट येऊन दुसरी गाडी चोरण्यासाठी ससाणेनगर परिसरात आलो असल्याची आरोपींनी कबूली दिली.

सेंटर गुन्ह्याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान 379(2) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतून चार, लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतून एक (रिक्षा), लोणाकंद पोलीस स्टेशन हद्दीतून एक, फौजदार चावडी सोलापूर पोलीस स्टेशन हद्दीतून एक व इतर तीन अशा एकूण १० मोटरसायकल व एक ऑटोरिक्षा असे ११ गुन्हे उघड झाले आहेत. यामध्ये एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पुर्व प्रादेशिक विभाग) नामदेव चव्हाण, परिमंडळ पाचच्या पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक राजू अडागळे, दिगंबर शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, पोलीस हवालदार प्रदीप सोनावणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षिरसागर, पोलीस नाईक अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, पोलीस शिपाई अकबर शेख, शाहीद शेख, शशिकांत नाळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखिल पवार, प्रशांत टोणपे यांनी केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.