जबरदस्ती प्रेमासाठी विचारणा करत मुलीच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणारा रोमिओ जेरबंद

पिंपरी चंचवड;रस्त्यामध्ये अडवून तरुणीला जबरदस्ती प्रेमासाठी विचारणा केली.मात्र, तिने नकार दिला असता तिचा विनयभंग केला.आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली.सदरची घटना काळभोरनगर पिंपरी परिसरात घडली.

याबाबत पीडित तरुणीने गुरुवारी (दि. २९) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.आकाश भीमराव सावंत (वय २४, रा. सुदर्शन चौक लिलाबाई सावंत चाळ, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास पीडित तरुणी काळभोर नगर पिंपरी येथून जात होती. त्यावेळी आरोपी आकाश याने तिला रस्त्यात अडवले व प्रेमासाठी विचारणा केली.मात्र, तिने त्यास नकार दिला. याचा राग आल्याने आरोपी आकाश याने तिला शिवीगाळ करत विनयभंग केला. तसेच फिर्यादी व तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली.सदर गुन्ह्याखाली आरोपीस अटक केली आहे.

पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.