तृतीयपंथीयांकडून सोसायटीवर दगडफेक,९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

हिंजेवडी;माण येथे मेगापोलीस सोसायटीच्या संरक्षक भिंतीच्या कामावर तृतीयपंथीयांसह नऊ जणांनी मिळून दगडफेक केली. या प्रकरणात एका तृतीयपंथीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत सुनिल लक्ष्मण यादव (वय ५८, रा. ताडीवाला रोड, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.साक्षी रश्मी दाभाडे (वय ३३, रा. चांदोली, ता. खेड) असे अटक केलेल्या तृतीयपंथीचे नाव आहे. या आरोपीसह याबाबत रोहिदास सावंत, बायडाबाई सावंत, छाया रोहिदास सावंत (तिघे रा. माण, ता. मुळशी), सीमा गौरी दास, शिल्पा, पलक, संजना आणि एक तृतीयपंथी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गवारवाडी माण येथे मेगापोलीस सोसायटीच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. हे काम करू नये यासाठी आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या कामगारांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर आरोपी पळून गेले. तृतीयपंथीयांनी फिर्यादी आणि कामगारांवर दगडफेक करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यास प्रतिबंध केला.

पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.