प्रतिबंधित गुटखा विक्रिकरणारे २ सराईतांवर गुन्हा दाखल,४.५ लाखाचा मुद्देमाल जप्त

हिंजवडी;गुटखा विक्रीसाठी प्रतिबंधित असताना १ लाख २३ हजार ५५२ रुपयांची सुगंधी तंबाखू आणि गुटखा पोलिसांनी ताब्यात घेतला. सदरची कारवाई हिंजवडी, जांबे रोड परिसरात करण्यात आली.

पोलीस कर्मचारी रवि प्रकाश पवार यांनी गुरुवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हेमाराम अम्राराम प्रजापती (वय २८ रा. मगरवस्ती मु.पो. जांबे ता. मुळशी) आणि माल देणारा गुजरातमधील व्यक्ती (नाव पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास कोलते पाटील सोसायटी ते जांबे रोडवर आरोपी (एम एच 14 / एच जी 4228) टेम्पोमधून गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार पोलिसांनी टेम्पोची पाहणी केली असता त्यामध्ये १ लाख २३ हजार ५५२ रुपयांची सुगंधित तंबाखू व गुटखा मिळून आला. टेम्पोसह पोलिसांनी ४ लाख ७३ हजार ५५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.