गॅस सिलेंडरची सबसिडी अकाऊंट ला जमा होत नाही? असा करा अर्ज

मागील काही महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती सतत वाढत आहेत. एलपीजीचे दर उद्या म्हणजेच १ ऑगस्ट रोजी पुन्हा निश्चित केले जातील. त्यामुळे पुन्हा सिलेंडरच्या किमती वाढू शकतात. अशा परिस्थितीत सबसिडी अत्यंत महत्वाची झाली आहे. जर तुम्हाला सबसिडीचा लाभ मिळत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही पुन्हा सबसिडी मिळवू शकता.

गॅस सबसिडीसाठी साठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया:

प्रथम www.mylpg.in या संकेतस्थावर जाऊन आणि आपला सर्व्हिस प्रोव्हायडर निवडा.

आता एक नवीन पेज तुमच्या समोर उघडेल. येथे तुम्हाला साइन इन आणि नवीन वापरकर्ता (न्यू युझर) असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही आधी लॉग इन केले असेल तर तुम्हाला तुमचा आयडी आणि पासवर्ड माहित असेल. त्याद्वारे लॉग इन करा. जर तुम्ही यापूर्वी कधीही लॉग इन केले नसेल तर नवीन वापरकर्ता पर्याय निवडा.

आता एक नवीन पान तुमच्या समोर उघडेल. यामध्ये उजव्या बाजूला View Cylinder Booking History चा पर्याय निवडा. आता तुम्हाला किती सबसिडी मिळाली आणि केव्हा? याबाबतची संपूर्ण माहिती मिळेल.जर तुम्हाला सबसिडी मिळाली नसेल, तर फीडबॅक बटणावर क्लिक करून तुमची तक्रार नोंदवा.परंतु, जर तुम्ही अद्याप एलपीजी आयडी तुमच्या खात्याशी लिंक केले नसेल, तर तुम्ही वितरकाकडे (सर्व्हिस प्रोव्हायडर) जाऊन हे काम करून घ्या.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.