आलिशान चारचाकी वाल्याची दुचाकीस्वार तरुणीला मारहाण,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे;बीएमडब्ल्यू कार चालकाचा धक्का लागल्याने गाडी हळू चालवा असेच सांगणाऱ्या दुचाकीस्वार तरुणीला बीएमडब्ल्यू चालकाने लाकडी दांडक्याने भररस्त्यात मारहाण केली. वानवडीतील ब्रँड फॅक्टरी च्या समोर हा प्रकार घडला.

याप्रकरणी वैष्णवी गणेश ठुबे (वय २३) या तरुणीने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एम एच 12 एम क्यू 56 या बीएमडब्ल्यू कारमधील एक महिला आणि चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी दुचाकीने वाहना वर जात असताना बीएमडब्ल्यू कार चालकाने त्याची कार वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून, वेगाने चालवून फिर्यादीच्या गाडीला पाठीमागून ओव्हरटेक करताना फिर्यादीच्या वहिनीच्या पायाला गाडीचा धक्का लागला. यामुळे फिर्यादीने कार चालकाला गाडी हळू चालवा असे सांगितले. याचाच राग आल्याने बीएमडब्ल्यूमधील कार चालकाने फिर्यादीना वाईट शिवीगाळ केली आणि नंतर फातिमानगर चौकात गाडी थांबून गाडी मधील लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या खांद्यावर आणि पाठीवर मारहाण केली. यामध्ये फिर्यादीच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. सदर प्रकरणी वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास वानवडी पोलिस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.