पोलिसांसारखा गणवेश घालून लोकांना गंडा घालणारे २सराईत जेरबंद,चाकण पोलिसांची कामगीरी

आळंदी; आळंदी-चाकण रस्त्यावर पोलिसांसारखा खाकी गणवेश घालून रिक्षा चालकांकडून पैसे घेणा-या २ सराईताना चाकण पोलिसांनी ताब्यात घेतले.

याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मच्छिंद्र पोपट भांबरे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिंद्र पांडुरंग झोंबाडे (वय ३६, रा. चाकण, आगरकरवाडी) व चंद्रकांत वामन कांबळे (वय ३६, रा. चाकण, खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी आळंदी-चाकण घाटातील रस्त्यावर पोलिसांसारखा खाकी गणवेश घालून रिक्षा चालकांना थांबवत त्यांची कागदपत्रे चेक करत.तसेच तुमच्यावर कारवाई करतो असे म्हणून त्यांच्याकडून पैसे घेत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.