अवैध दारूविक्री प्रकरणी ४ ठिकाणी छापा,६ लाखाचा मुद्देमाल जप्त

चिंचवड;अवैध दारूविक्री प्रकरणी चाकणमध्ये तीन तर वाकडमध्ये एका ठिकाणी कारवाई करण्यात आली.चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३ ठिकाणी तर वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ ठिकाणी. या चार कारवायांमध्ये पोलिसांनी ६ लाख ६६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चाकण पोलिसांनी तीन ठिकाणी कारवाई केली. त्यात पहिली कारवाई शुक्रवारी दि. ३० दुपारी एच पी चौक महाळुंगे येथील हॉटेल तुळजा भवानी येथे करण्यात आली. सत्यपाल किशोर बोरकर (वय ३८, रा. खालुम्ब्रे, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी हॉटेलमधून ६ हजार ९८० रुपयांची विदेशी दारू जप्त केली.

चाकण पोलिसांनी दुसरी कारवाई शनिवारी दि. ३१ सायंकाळी खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव मधील चाकण-शिक्रापूर रोडवर असलेल्या हॉटेल शिवराज चायनीज येथे केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी ४ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी विशाल रामदास येनभर (वय २३, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील तिन्ही प्रकरणांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

चाकण पोलिसांनी तिसरी कारवाई शनिवारी दि.३१ दुपारी खेड तालुक्यातील गडद गावच्या हद्दीत केली. यात ७ हजार १३५ रुपयांच्या देशी, विदेशी दारूच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी अक्षय ज्ञानेश्वर साबळे (रा. गडद, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौथी कारवाई सामाजिक सुरक्षा पथकाने निंबाळकर नगर, ताथवडे येथील हॉटेल कोल्हापुरी व्हेज नॉनव्हेज येथे शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी केली. याप्रकरणी अशोक मोहनलाल चौधरी (वय ३३, रा. पवनानगर, चिंचवडगाव), प्रकाश विलास गायकवाड (वय २४, रा. ताथवडे) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाई मध्ये ६ लाख ४६ हजार ९५५ रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या आणि रोख रक्कम जप्त केली.

पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.