मोशी:दरवाजा तोडून दरोडा, साडेचार लाखच सोन लंपास

मोशी; गंधर्व नगरी सोसायटीत साडेचार लाखांचा दरोडा झाल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्यांनी दरवाजा तोडून घरातील सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

याप्रकरणी नारायण उत्तम जाधव (वय ३३, रा. गंधर्व नगरी, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचे सेफ्टी डोअर व आतील लाकडी दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने असा ४ लाख ५५ हजार ५/० रुपयांचा ऐवज चोरला आहे.

पुढील तपास मोशी पोलिस करत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.