माहिती अधिकार कार्यकर्त्याकडे मागितली खंडणी,२ टोळकी गजाआड,खंडणी विरोधी पथक २ ची कामगिरी

पुणे;पुणे पोलीस आयुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव सांगून माहिती अधिकार कार्यकर्त्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन आरोपीं ना अटक करण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या २ टोळक्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुधीर रामचंद्र अल्हाट (वय ५१) यांनी फिर्याद दिली आहे.
राहुल कांबळे व जहीर मेमन अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनसार,फिर्यादी सुधीर आल्हाट हे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. आरोपी राहुल कांबळे व जहिर मेमन हे दोघे सुधीर आल्हाट यांनी कोठे आरटीआय टाकला आहे याबाबत माहिती मिळवली. तीच माहिती ते दोघे घेत असुन.त्यानंतर त्या माहितीवर ब्लॅकमेल करून.अतिवरिष्ट अधिकाऱ्यांची ओळख असल्याचे सांगत खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होते. दरम्यान त्यांनी सुधीर आल्हाट यांना २ लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. त्या दोघांनी त्यांच्याकडून ऑनलाइन २५ हजार तीन वेळा असे ७५ हजार रुपये बँक खात्यावर घेतले.त्यानंतर शुक्रवारी जंगली महाराज रस्त्यावर एक हॉटेलात भेटण्यास बोलावले व उर्वरित सव्वा लाख रुपयांची खंडणी मागणी केली. त्यानुसार दोघे आल्यानंतर आज सुधीर आल्हाट व खंडणी विरोधी पथक २ च्या पथकाने सापळा रचून साखर संकुल समोर या दोन आरोपींना पैसे देताना रंगेहात पकडले. या सर्व प्रकाराचे लाईव्ह मोबाईलमध्ये कैद करण्यात आले आहे.

सदरची कारवाई वरिष्ठ निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बुवा व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.