दुचाकीस्वार चोरट्यांनी ६० हजारांचे दागिने केले लंपास, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

वाकड;अट्टल चोरट्यांनी मोठ्या हतचालकीने महिलेचे ६० हजार रुपयांचे दागिने फसवणूक करून चोरून नेले. ही घटना काळेवाडी फाटा येथे घडली.

शोभा लक्ष्मीकांत कदम (वय ४३, रा. पवार गल्ली क्रमांक-८, काळेवाडी फाटा, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास आरोपी हे फिर्यादी महिलेच्या जवळ आले. त्यांनी फिर्यादीकडे सुट्टे पैसे मागितले. त्यानंतर आरोपींनी जवळ दोन लाख रुपये असल्याचे सांगून कागदाचा बंडल फिर्यादी यांच्या पिशवीत टाकला.इतना सोना है कोई तो चुरायेगा,’ असे म्हणून शोभा यांचा विश्वास संपादन केला. तसेच फिर्यादी शोभा यांना दागिने काढायला लावून रुमालात ठेवण्यास सांगितले. हातचलाखी करून चोरट्यांनी तेच ६० हजारांचे सोन्याचे दागिने पळून नेले.

पुढील तपास वाकड पोलिस आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.