लाच स्वीकारताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस गजाआड,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कामगिरी.

पुणे;हाणामारीच्या प्रकरणात गुन्हा दाखल नाही होणार हे सांगून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याला रंगेहात पकडुन बेड्या ठोकल्या. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कामगिरी.

दादासाहेब नामदेव ठोंबरे (वय ५०) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या आरोपी कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलात ते कार्यरत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार,तक्रारदार व्यक्तीचे भांडण झाले होते. नंतर हे प्रकरण पोलिसात गेले होते. केस दाखल करताना या प्रकरणातून तक्रारदार व्यक्तीचे नाव कमी करण्यासाठी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस कर्मचारी असलेल्या दादासाहेब यांनी १ लाख १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.तक्रारदार व्यक्तीने ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी या माहितीची खातरजमा केली आणि आज सकाळी ही लाच स्वीकारताना संबंधित कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.