मंचर:अट्टल सराईत गुंडाची भर दिवसा गोळ्या घालून हत्या

पुणे;पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये भरदिवसा गोळ्या झाडून सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. ओंकार उर्फ राण्या बाणखेले असे खून झालेल्या अट्टल गुंडाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, मृत ओंकार उर्फ राण्या बाणखेले सराईत अट्टल गुन्हेगार होता. त्यामुळे पूर्ववैमनस्यातून त्याचा खून करण्यात आला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय.काही हल्लेखोरांनी त्याच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. बंदुकीची गोळी डोक्यात लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंचर पोलीस घटनास्थळी जाऊन शोधमोहीम सुरू केली आहे. मृतदेह ताब्यात घेऊन रूग्णालयात पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंचर पोलीस ठाण्यात या प्रकरणी दाखल करण्यात आला आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.