बाईकवर टेम्पो घालून सोलापुरात शिवसैनिकांची दुहेरी हत्या, पाच जणांना कर्नाटकातून अटक

सोलापूर :सोलापुरातील मोहोळमध्ये शिवसैनिकांची दुहेरी हत्या केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. शिवसैनिकांच्या बाईकवर टेम्पो घालून अपघात असल्याचं भासवत हत्या करण्यात आली होती. कर्नाटक राज्यात लपून बसलेल्या 5 संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. शिवसैनिक विजय सरवदे आणि सतीश क्षीरसागर यांचा अपघाताच्या आडून खून झाला होता.

संतोष जनार्दन सुरवसे, रोहित ऊर्फ अण्णा फडतरे, पिंटू जनार्दन सुरवसे, आकाश ऊर्फ गोटू नामदेव बरकडे, संदीप ऊर्फ गोट्या सरवदे (सर्वजण रा. मोहोळ, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,नगरपरिषदेच्या राजकारणातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकाची हत्या केल्याचा प्रकार 15 जुलै 2021 रोजी समोर आला होता. बाईकने जाणाऱ्या दोघा शिवसैनिकांवर पाठीमागून टेम्पो घातल्याने सतीश नारायण क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या विजय सरवदे यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

या प्रकरणात मोहोळ पोलिसांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतोष जनार्दन सुरवसे, रोहित उर्फ अनिल फडतरे, पिंटू सुरवसे, टेम्पो चालक भैय्या अस्वले या चौघांच्या विरोधात त्यावेळीच गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी टेम्पो चालक भैय्या अस्वले याला 15 जुलैलाच अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान आणखी दोघांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपींची संख्या सहा इतकी झाली होती. मात्र भैय्या अस्वले वगळता उर्वरित पाच आरोपी पोलिसांच्या हाती लागले नव्हते. त्यामुळे आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी मृताच्या नातेवाइकांकडून पोलिस प्रशासनासमोर आक्रोश सुरू होता.

मोहोळ पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस कर्मचारी सुरवातीपासूनच फरार आरोपींच्या मागावर होते. आरोपींच्या मोबाईल लोकेशनवर ते सतत नजर ठेवून होते. दरम्यान, फरार आरोपी कर्नाटक राज्यातील आळंद परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी यापूर्वी त्या ठिकाणी जाऊन आरोपींचा शोध घेतला होता; मात्र ते मिळून आले नव्हते. दरम्यान, पुन्हा एकदा आरोपी आळंद परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल शरद ढावरे, पो. कॉ. गणेश दळवी, पांडुरंग जगताप, हरीश थोरात यांच्या पथकाने सोमवारी (2 ऑगस्ट) रोजी हिरोळी (ता. आळंद, कर्नाटक) येथे साध्या वेशात सापळा लावला होता. सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान या खून प्रकरणातील संशयित फरार आरोपी संतोष जनार्दन सुरवसे, रोहित ऊर्फ अण्णा फडतरे, पिंटू जनार्दन सुरवसे, आकाश ऊर्फ गोटू नामदेव बरकडे, संदीप ऊर्फ गोट्या सरवदे (सर्वजण रा. मोहोळ, जि. सोलापूर) त्या ठिकाणी आले. या वेळी पोलिस पथकाने गराडा घालून मोठ्या शिताफीने त्यांना पकडले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.