रक्षकच झाला भक्षक; पिंपरी चिंचवडमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा  

पिंपरी चिंचवड : पहिल्या पत्नीला घटस्फोट देतो असे सांगून दुसऱ्या महिलेसोबत वारंवार अत्याचार केल्याची घटना सांगवीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी सातारा ग्रामीण पोलीस  दलात कार्यरत असणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकावर सांगवी पोलीस ठाण्यात बलात्काराचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना 28 फेब्रुवारी 2021 ते 16 जून 2021 या कालावधीत पिंपळे गुरव येथील शिवम बिल्डिंग, ओंकार कॉलनी येथे घडली.

शिवाजी बबन भोसले असे गुन्हा दाखल झालेल्या सहायक निरीक्षकाचे नाव असून सध्या सातारा पोलिस दलात कार्यरत आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवाजी भोसले यांनी फिर्यादी महिलेसोबत गंधर्व पद्धतीने विवाह केला. त्यानंतर पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन तुला नांदवतो असे खोटे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तिला बदनामीची धमकी देऊन मारहाण केली. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

संबंधित महिला पुणे शहरात राहत होती. त्यावेळी त्या महिलेचा नवरा त्रास देत असल्याने ती पोलीस ठाण्यात गेली. तिने नवऱ्या विरुद्ध तक्रार दिली. या तक्रारीचा तपास दरम्यान भोसले आणि त्या महिलेची ओळख झाली. या ओळखीतून त्यांचे रिलेशन वाढले आणि दोघांनी गधंर्व पद्धतीने लग्न केले. काही दिवस पीडित महिला सातारा येथे राहत होती.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.