देहूरोड परिसरातील १२ जणांच्या टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांची मोक्का कारवाई
पिंपरी चिंचवड : देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार अरवाज वशीर शेख टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९(मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अरवाज वशीर शेख यांच्यासह 12 साथीदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्यात आलेल्या मध्ये 6 जण अल्पवयीन मुले आहेत.
टोळी प्रमुख अरबाज बशीर शेख (वय-२३ वर्षे, रा. गहुंजे, मावळ, पुणे ), सलमान बशीर शेख (वय-२२ वर्षे, रा. गहुंजे, मावळ, पुणे.), संतोष ऊर्फ सोन्या चंद्रकांत धरणे (वय-३२ वर्षे, रा. एलीमेंट बिल्डींगचे बाजुला, थॉमस कॉलनी, मामुर्डी, पुणे), जे.डी. आरबाज उस्मान खान (वय १९ वर्षे, रा. जामा मस्जिद जवळ, देहूरोड, पुणे.), नियाज जमीर शेख (वय-२३ वर्षे, रा. सी/ओ सातपते थॉमस कॉलनी, मामुर्डी, पुणे), प्रिन्स ऊर्फ सोनु जॉन्स माखवाणी (वय-२५ वर्षे, रा. थॉमस कॉलनी,मामुर्डी, पुणे), हुसेन हमीद सय्यद (वय-२१ वर्षे, रा. थॉमस कॉलनी, मामी, पुणे.), मौला ऊर्फ लादेन ऊर्फ कादीर कलीम खान (वय-१९ वर्षे, रा. साईनगर, गहुंजे ता. मावळ, जि. पुणे.), अभिजीत हिरामण बोडके, रा. गहुंजे, मावळ, पुणे), संजय चोपडे (रा. गहुंजे, मावळ, पुणे), समीर जमील शेख (रा.गहुंजे, मावळ, पुणे), पार्थीवन क्रिश्न विरण (रा. गहुंजे, मावळ, पुणे) यांच्या विरोधात ही मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
मोक्का कारवाई झालेल्या आरोपीविरूध्द खुनाचा प्रयत्न, दुखापत,
गंभीर दुखापत, चोरी, जबरी चोरी, दुखापत करुन जबरी चोरी, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, खंडणी, जाळपोळ, पळवून नेणे, गर्दी-मारामारी_असे एकुण २८ गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड शहर याठिकाणी दाखल आहेत. तसेच वरील सर्व आरोपी वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरूध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियत सन १९९९ अंतर्गत कारवाई करणे
बाबत प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचेकडे पाठविला होता.
पोलीस उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीसीबी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी त्या प्रस्तावा मधील कागदपत्रांची छाननी करून हा प्रस्ताव अपर आयुक्तांकडे पाठवला. अपर आयुक्त रामनाथ पोकळे यांनी मंगळवारी (दि. ३) मोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!