नेपाळ देशातील तरुणांच्या टोळीकडुन घरफोडीचे २ गुन्हे उघड, विमानतळ पोलिसाची कारवाई

पुणे : घरपोडी करणाऱ्या ४ जणांच्या टोळीला विमानतळ पोलीसांनी अटक केली आहे. अटक केलेले आरोपी नेपाळचे आहे. पोलीसांनी त्यांचे २ गुन्हे उघडकीस आणून ६ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नयनसिंग खडखसिंग ढोली (वय ४० सुरकेत काठमांडु
नेपाळ), गंगे मने दमय (वय २४ बारल्ला जि – मोगलसेन काठमांडु नेपाळ), भिम दिपक थापा (वय १९ रा. घाटागाव, जि- सुरकेत काठमांडु नेपाळ), महेंद्र दिपक नेपाली (वय १९ वर्षे घाटागाव, जि
सुरकेत काठमांडु नेपाळ सध्या रा.नेहरु नगर निगडी पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.याप्रकरणी दत्ताराम देसाई यानी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी हे स्कायवन कॉर्पोरेट पार्क, एअरपोर्ट रोड विमाननगर पुणे येथे स्टोअर मॅनेजर या
पदावर नोकरी करीत असून १९ जुलै ते २० जुलै या दरम्यान त्यांच्या स्टोअरचा पत्रा उचकटुन स्टोअर मधील ३ लाख रुपये किमतीचे कॉपर पटटी व कॉपर आर्थिंग वायर चोरुन नेलेचे लक्षात आल्या नतर त्यांनी विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली.

गुन्हयातील चोरी करणारे आरोपीनी कोणत्याही प्रकारचा पुरावा मागे न ठेवता सदरची चोरी केल्याने गुन्हा उघडकीस येण्या मध्ये अडचणी निर्माण होत होत्या. तपासी अधिकारी व त्यांचे पथकाने कसोशिने तपास केला असता नमुद गुन्हा नेपाळ देशातील तरुणांनी केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली.

पोलीसांनी आरोपींकडे चोकशी केली असता त्यांनी गुन्हा केला असल्याची कबुली देवुन चोरलेला माल व गुन्हा करताना वापरलेला चारचाकी टेंपो असा सर्व मिळुन ६ लाख रुपये किमतीचा मुदेमाल हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

पोलीसांनी अधिक तपास केला असता आरोपीनी ५ जुन रोजी मध्यरात्री निकोगार्डन काश्मिर चौक महाराष्ट्र बॅके समोर विमाननगर पुणे या ठिकाणा वरुन महिला  पुनम चौहान यांचे प्रापंचिक वस्तुचोरी केल्याची कबुली दिली असुन सदर वस्तु तपासा दरम्यान पोलीसांनी हस्तगत केल्या

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.