बारावी गुणांच्या आधारावरच प्रथम वर्षाला प्रवेश मिळणार ; उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

पुणे : कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी उद्यापासून बारावीच्या निकालानुसारच प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची सीईटी नसून नेहमीप्रमाणेच मेरीटलीस्टनुसार प्रवेश होणार असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत दिली.  तसेच महाविद्यालयांचे पुढील सत्र ऑफलाइन पद्धतीने सुरू व्हावे, याबाबत येत्या आठ दिवसांत आढावा घेऊन निर्णय जाहीर केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

इयत्ता अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेतली जात आहे. त्यामुळे बारावीनंतरच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सुद्धा सीईटी घेतले जाणार का ? याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, बुधवारी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूबरोबर झालेल्या बैठकीत या प्रवेशासाठी सीईटी घेतली जाणार नसल्याचा निर्णय झाल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

तसेच मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३३ हजार ९०८ ने वाढली आहे. त्यामुळे महाविद्यालयांना तुकडी वाढ किंवा विद्यार्थी प्रवेश क्षमतावाढ देण्याबाबत कुलगुरूंनी तात्काळ निर्णय घ्यावा, यासं चर्चा करण्यात आले आहे. संदर्भातील प्रस्ताव येत्या ३१ ऑगस्ट पूर्वी राज्य शासनाला सादर करावेत, असेही सामंत त्यांनी नमूद केले

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.