लॅपटॉप बंद पडला म्हणून दहा वर्षाच्या मुलाने सोडले घर ; वाकडं पोलीसांनी ३ तासाच्या आत मुलाला शोधुन दिले वडिलांच्या ताब्यात
पिंपरी चिंचवड : दहा वर्षाच्या मुलाकडून घरातील लॅपटॉप बंद पडला म्हणुन भितीने राहत्या घरातुन कोणास काही एक न सांगता घरातुन निघुन गेला. हा प्रकार सोमवारी (दि. 2) रात्री नऊ वाजताच्या सुमारास वनदेव कॉलनी, थेरगाव येथे घडला. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर अवघ्या तीन तासात मुलाचा शोध घेऊन त्याला सुखरूपपणे पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विष्णू ज्ञानोबा कास्टे (वय 33, रा. वनदेव कॉलनी लेन क्रमांक एक, थेरगाव) यांच्या दहा वर्षीय मुलाकडून घरातील लॅपटॉप बंद पडला. म्हणुन भितीने राहत्या घरातुन कोणास काही एक न सांगता घरातुन निघुन गेला. नातेवाईकांकडे मिळुन न आल्याने त्यास कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी अमिष दाखवुन अज्ञात कारणासाठी पळवुन नेले असावे म्हणुन ३ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास कासटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी पोलिसांना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना दिल्या.
पोलिसांनी विष्णू कास्टे यांच्या घराच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये त्यांचा मुलगा स्काय फिट या जिम जवळील बोळीमध्ये बसलेला असल्याचे आढळून आले. तीन तासाच्या आत वाकड पोलिसांनी मुलाला शोधून त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील टोणपे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक जगताप, पोलीस अंमलदार विजय वेळापुरे, बाबाजान इनामदार, नितीन गेंगजे, तात्या शिंदे यांनी केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!