ओढणीने गळफास घेऊन डॉक्टरची आत्महत्या, सांगलीतील धक्कादायक घटना

सांगली :  सांगलीतील एका डॉक्टराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी रात्री फ्लॅटमध्ये असलेल्या दोन बेडरुमपैकी एका बेडरुममध्ये त्यांनी छताच्या फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या  केली आहे.

डॉ. दीपक रामकृष्ण राऊत (वय, 55, रा. निर्मिती रेसिडेन्सी, चिंतामणीनगर, सांगली) असं आत्महत्या केलेल्या डॉक्टराचे नाव आहे. याप्रकरणी सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येच कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चिंतामणीनगर येथील निर्मिती रेसिडेन्सीमध्ये प्लॅट क्रमांक 402 मध्ये डॉ. राऊत राहण्यास होते. ते विश्रामबाग येथील आदित्य रुग्णालयात सेवेत होते.बुधवारी रात्री फ्लॅटमध्ये असलेल्या दोन बेडरुमपैकी एका बेडरुममध्ये त्यांनी छताच्या फॅनला पांढर्‍या रंगाच्या ओढणीने गळफास घेतला.

हा प्रकार पहाटे 6 च्या दरम्यान समोर आला आहे. याबाबत माहीती मिळताच संजयनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह सरकारी रुग्णालयात तपासणी केला. त्यानंतर मृतदेह कुंटूबीयांच्या ताब्यात दिले गेले.

डॉ. राऊत यांच्या नातेवाईक वर्षा सचिन माने यांनी याबाबतची फिर्याद दिली. प्राथमिक तपासात आत्महत्येचे नेमके कारण समजले नसल्याचे पोलिसांनी सांगित

दरम्यान, या डाॅक्टराने लिहीलेली एक चिठ्ठी सापडली आहे. त्या चिठ्ठीमध्ये असं लिहीलं आहे की, ताई, दादा, पिंकू मला माफ करा, मी स्वखुशीने जीवन संपवत आहे. याबाबत कोणालाही जबाबदार धरू नये, असं डॉ. राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, पती- पत्नीत वारंवार वाद होत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत फिर्याद डॉ. राऊत यांच्या नातेवाईक वर्षा सचिन माने यांनी दिली आहे. तर, डॉ. राऊत यांच्या पत्नी या महापालिकेत नोकरीस आहेत.

डॉ. राऊत यांना पोलिसांनी समजवले होते

याबाबत पोलिसांनी सांगितले, मंगळवारी रात्री डॉ. राऊत हे ‘मी आत्महत्या करणार’, असे म्हणत होते. त्यासाठी त्यांनी दोरीही घेतली होती. ही माहिती त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिली.

जवळच पोलिस ठाणे असल्याने पोलिसांनी तत्काळ धाव घेतली. डॉ. राऊत यांच्याकडील दोरी काढून घेतली. त्यांची समजूत काढून शांत केले होते. तरीसुद्धा त्यांनी रात्री आत्महत्या केल्याचे सकाळी उघड झाले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.