कंडोम आणण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलावर चाकूने वार

पुणे  : मेडिकलमधून कंडोम आणून देण्यास नकार दिल्याने एका अल्पवयीन मुलावर चाकूने वार करून खूनी हल्ला करण्यात आला.ही धक्कादायक घटना खराडी येथील थिटे वस्ती येथे मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. मुलाच्या गळ्यावर चाकुने वार करण्यात आले आहे.

निलेश वाघमारे (21, रा.चंदननगर) याच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी तुकाराम नगर येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने चंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगा महाविद्यालयात शिक्षण घेतो. तो मित्राला भेटण्यासाठी थिटे वस्तीतून चालला होता. तेथे उभ्या असलेल्या निलेशने त्यास पैसे देऊन मेडिकलमधून कंडोम आणण्यास सांगितले. मात्र पिडीत मुलाने त्यास नकार दिला.

यामुळे निलेशने त्यास चिडून जाऊन शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. “माझे काम तु ऐकत नाहीस काय? थांब आता तुला जिवंत सोडत नाही’ असे म्हणत तेथे असलेल्या वडापावच्या हॉटेलमधून चाकू घेऊन आला. या चाकूने पिडीत मुलाच्या गळ्यावर वार करुन त्याला गंभीर जखमी केले.

नागरिकांनी या मुलाला तात्काळ रुग्णालयात नेले व पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला असून, हल्लेखोर आरोपीचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ निरीक्षक सुनिल जाधव करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.