केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली 12.60 लाखाची फसवणूक

पिंपरी चिंचवड : बँकेतून बोलत असल्याचे सांगून केवायसी अपडेट करण्याच्या  बहाण्याने ठगांनी वाकडं मधील 34 वर्षीय महिलेच्या खात्यातून 12 लाख 60 हजार रुपये काढल्याप्रकरणी वाकडं पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वाकड येथे 24 ते 26 जुलै दरम्यान वाकड येथे घडली.

अनुजा चिरायू जोशी (वय 34 रा. पलाश प्लस सोसायटी, कावेरी नगर, वाकड) यांनी बुधवारी (दि. 4) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8345087114 या मोबाईल क्रमांक धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जुलै रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी अनुजा यांना त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. या मेसेजमध्ये एसबीआय बँकेतील फिर्यादी अनुजा त्यांची आई अलका आणि वडील अरुण चौधरी यांचे नावे जॉइंट अकाउंट असलेल्या एसबीआय बँकेत खात्याबाबत मजकूर होता. केवायसी अपडेट न केल्यामुळे खाते ब्लॉक करण्यात आल्याचा तो मेसेज होता. त्यामुळे त्यांनी तो मेसेज आपल्या आईला पाठवला. सदर मोबाइल नंबरवर फोन केला असता मोबाईल धारकाने राहुलकुमार शर्मा मुंबई कार्यालयातून बँक ऑफिसर बोलत असल्याचे सांगितले.

त्यानंतर फिर्यादी यांच्या आईचा विश्वास संपादन करून त्यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती आरोपीने घेतली. फिर्यादी यांच्या आईकडून ओटीपी प्राप्त करून त्यांच्या बँक खात्यातील 12 लाख 60 हजार रुपयांची रक्कम परस्पर वळून फसवणूक केली. त्यापैकी सहा लाख रुपये रोकड वाकड पोलिसांमार्फत होल्ड करण्यात आली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.