तरूणीवरून झालेल्या वादातून गुप्तीने वार करून तरुणाची निर्घृण हत्या ; नागपुरात खळबळ

नागपूर : ‘फ्रेंडशिप डे’ ला तरूणीवरून झालेल्या वादादून मित्रानेच मित्राची गुप्तीने वार करून हत्या केल्याची घटना नागपूरातील हिवरीनगर एनआयटी गार्डमध्ये घडली आहे.

अनिकेत नरेंद्र भोतमांगे (वय २१ रा. गड्डीगोदाम), असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी सूत्रधार वैभव बांगडे (वय २०, रा. वाठोडा वस्ती), सुमित ऊर्फ भोला वाघमारे (रा. जयभीम चौक), शोएब (वय २०, रा. हिवरीनगर) व नचिकेत पवार (वय १९, रा. हिवरीनगर) या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,फ्रेंडशिप डे दिवशी अनिकेत आणि त्याचे मित्र फिरायला गेले होते. यादरम्यान अनिकेत आणि वैभव यांच्यात एका तरूणीवरून वाद झाला. त्यानंतर वैभवने अनिकेतबाबत राग डोक्यात ठेवून त्याला संपवण्याचे षड्यंत्र रचले.मंगळवारी रात्री अनिकेत, रोहण, अभिषेक, समीर हे चौघे हिवरीनगर परिसरात आले. तिथे ते पार्टी करत होते. यादरम्यान वैभव व त्याचे साथीदारही तेथे आले. वैभवने अनिकेतसोबत वाद घातला. यावेळी वैभव व त्याच्या साथीदारांनी गुप्तीने सपासप वार करत अनिकेतला जखमी करून पसार झाले.

अनिकेत याला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी मुख्य आरोपी वैभव बांगडे, सुमित वाघमारे, शोएब, नचिकेत पवार या चौघांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अटक आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.