मंचर गोळीबार प्रकरण ! गुंड ओंकार बाणखेले खून प्रकरणी 7 आरोपींना अटक

पुणे : आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील सराईत गुन्हेगाराच्या गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी या गुन्ह्यातील 9 आरोपींपैकी 7 जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ राण्या बाणखेले (वय, 25) याची एकलहरे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.या गुन्ह्यातील नऊ आरोपींपैकी सात जणांना स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना शनिवार (दि. 7) पर्यंत घोडेगाव न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दोन आरोपी फरार असून, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

चेतन सत्यवान गायकवाड (वय 19, रा. आनंदवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर), राम सुरेश जाधव (वय 22, रा. आंबेठाण, ता. खेड), सौरभ कैलास पोखरकर (वय 19, रा. मंचर), आकाश संतोष खैरे (वय 20, रा. वारुळवाडी, ता. जुन्नर), लुट्या ऊर्फ तुषार नितीन मोरडे (रा. मंचर) यांच्यासह दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. संतोष सुनील जाधव (रा. पोखरी), पवन सुधीर थोरात (रा. मंचर) हे दोन आरोपी फरार आहेत.याबाबत मंचर पोलीस ठाण्यात ओंकार बाणखेले यांचा भाऊ मयूर बाणखेले याने सोमवारी (दि. 2) दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता

मिळालेल्या माहितीनुसार, फरारी आरोपी संतोष जाधव याने त्याच्या सोशल मीडियावर सूर्य उगवायच्या आत तुला संपवतो असं स्टेटस ठेवलं होतं. त्यावरून ओंकार ऊर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले याने त्याच्या सोशल मीडियावर त्यास प्रत्युत्तर म्हणून संतोष जाधव भेटणार तेथे ठोकणार, कुठेपण असू दे, तू असे स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून 3 अज्ञातांनी एकलहरे गावाच्या हद्दीत सुलतानपुर रस्त्यावर मोटारसायकलवरून येऊन ओंकार ऊर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले याच्यावर रविवारी 1 ऑगस्ट रोजी भरदुपारी गोळीबार करुन हत्या केली गेली.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.