खुनाच्या गुन्हयात सहा महिन्यांपासुन फरार असलेल्या आरोपीला अटक ; लोणीकंद पोलिसांची कामगिरी

पुणे : खुनाच्या गुन्हयात सहा महिन्यांपासुन तसेच दरोडयाची पुर्व तयारी व शस्त्र अधिनियम गुन्हयांत पाहिजे असलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. प्रविण ऊर्फ अजय राजेंद्र माकर (रा. वाघोली गायरान ता.हवेली जि.पुणे मुळ रा.न्हावरा,ता.शिरुर,जि.पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. मागील सहा महिणे पोलीस त्याचा माग काढत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,लोणीकंद पोलीस स्टेशन मधील मौजे लोणीकंद गावचे हद्दीत 9 फेबुवारीला दुपारी 12 च्या सुमारास एच.डी.एफ.सी. बॅकेचे ए.टी.एम. समोर अज्ञात व्यक्तींनी सचिन नानासाहेब शिंदे( 29 रा.लोणीकंद ता.हवेली जि.पुणे) यांस त्याचे पाठीमागुन येऊन पिस्तूलाने गोळीबार करुन त्याचा खुन केला होता. सदर गुन्हयात सहा महिन्यांपासुन माकरचा पोलीस शोध घेत होते. तसेच त्याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात ही एक गुन्हा दाखल असून गुन्हे शाखा युनिट ०६ पुणे शहर ने दरोडयाचे तयारीत असलेल्या गुन्हेगारांवर लोणीकंद पोलीस स्टेशनला दाखल  केलेल्या गुन्हयामध्येही तो पाहिजे होता.

सदर गुन्ह्यांचे अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सुरज किरण गोरे पथकासह लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत होते. यावेळी सुरज गोरे व पोलीस अंमलदार समीर पिलाने यांना खबर मिळाली की, गुन्हयामध्ये पाहिजे असलेला आरोपी  प्रविण ऊर्फ अजय राजेंद्र माकर हा सांगवी सांडस फाटा ता. हवेली जि. पुणे येथे येणार आहे. सदर बातमीवरुन आरोपीताचा तपास पथकातील स्टाफने पाठलाग करुन पुढील तपासकामी ताब्यात घेतले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त नामदेवराव चव्हाण, उप आयुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक तटकरे यांचे मार्गदर्शनाखाली उप-निरीक्षक,सुरज गोरे, सहायक फौजदार मोहन वाळके, पोलस अंमलदार अजित फरांदे, कैलास साळुके, विनायक समीर पिलाणे, सागर कडु, बाळासाहेब तनपुरे यांच्या पथकाने कारवाई केलेली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.