धक्कादायक ! तीन दिवसांच्या बाळाला आळंदीत टाकून अज्ञात पसार

आळंदी : आळंदी-मरकळ रस्त्यावर धानोरी फाटा भागात उघडकीस आली. तीन दिवसांच्या बाळाला टाकून अज्ञात झाले आहेत. याबाबत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

देवेशनाथ चौहान (रा. धानोरी फाटा, मरकळ रोड, आळंदी) यांनी याबाबत गुरुवारी (दि. 5) आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरी फाटा, मरकळ रोड येथे शिव इंजीनियरिंग या कंपनी समोरील रस्त्याच्या बाजूला अज्ञातांनी दोन ते तीन दिवस वय असलेल्या पुरुष जातीच्या बाळाला सोडून दिले.त्या बाळाचे पालनपोषण व सांभाळ करण्याचे कर्तव्य असताना अज्ञातांनी त्याचा पूर्णपणे परित्याग केला. बाळाला रस्त्याच्या कडेला सोडून अज्ञात आरोपी पसार झाले आहेत.पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.