नायलॉन दोरीने  हात-पाय बांधून महिलेचा गळा आवळून खून ; पिंपरी चिंचवड मधील घटना

पिंपरी चिंचवड : नायलॉन दोरीने  हात-पाय बांधून व तोंडाला चिकटपट्टी लाऊन महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना  पिंपरी चिंचवडममधील चिखलीतील हरगुडेवस्ती येथे गुरुवारी (दि.५) सकाळी ११ वा उघडकीस आली.. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

कमला बाबूराव खाणेकर उर्फ नूरजहाँ अजिज कुरेशी (वय ५४, रा. बद्रा स्टील वर्क कंपनीसमोर, गट क्रमांक ७७६, हरगुडेवस्ती, कुदळवाडी, चिखली) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कमला यांनी अजिज कुरेशी याच्याशी आंतरजातीय विवाह केला होता. मात्र, सध्या त्या येथे एकट्याच रहायच्या. बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास त्या त्यांचे भाडेकरू यांच्याशी गप्पा मारून त्यांच्या घरी गेल्या होत्या. गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणारा व्यक्ती रूम भाड्याने घेण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता.

त्याने कमला यांना आवाज दिला मात्र कमला यांनी प्रतिसाद दिला नाही. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने घरात जाऊन बघितले असता कमला यांचे दोन्ही हात पाय नायलॉन दोरीने बांधून तोंडाला चिकटपट्टी लावलेल्या अवस्थेत त्या आढळल्या. याबाबत शेजाऱ्याने चिखली पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली असता कमल यांचे हात-पाय बांधून तोंडाला चिकटपट्टी लावून गळा आवळून खून केल्याचे समोर आले. खुनाचे कारण व मारेकरी कोण आहेत याचा शोध पोलिस घेत आहेत.

सदर घटनेबाबत चिखली पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून खुनाचे कारण व मारेकरी कोण आहेत याचा शोध पोलिस घेत आहेत. पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने हे करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.