पिंपरी चिंचवडमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू होता वेश्याव्यवसाय
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेतील युनिट चारच्या पोलिसांनी वाकड येथील व्हिजन मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे.याप्रकरणी दोन जणांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.5) पाचच्या सुमारास व्हिजन मॉलमधली ऑनर वेलनेस स्पा सेंटर येथे करण्यात आली
संतप्रताप रामाप्रताप सिंग (वय-37 रा. रुम नं. 05 सुदर्शन कॉलनी, मोरेवस्ती, साने चौक, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.तर एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारचे सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष संजय देशमुख यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बेंगलोर महामार्गावरील भूमकर चौकातील व्हिजन मॉलमधली गाळा नं. 230 मधील ऑनर वेलनेस स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट 4 च्या पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकला. त्यावेळी आरोपी 6 महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्याच्या कडून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करवून घेत होते. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन संतप्रताप सिंग याला अटक केली. पुढील तपास गुन्हे शाखा युनिट 4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळे करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!