पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, दरोड्याचा गुन्हा ७२ तासात उघडकीस १ कोटी ५४ हजार ५४० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत

पुणे : पोलीस असल्याची बतावणी करून एस टी चालकाला पाटस टोल नाक्याजवळ थांबवून चार कुरियर प्रवाशांची १ कोटी ५५ लाखांची रोकड लुटणाऱ्या त्रिकुटाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली. त्यांच्याकडून १ कोटी ५४ हजरांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रामदास भाऊसाहेब भोसले (वय ३०), तुषार बबन तांबे (वय २२, दोघेही रा. वरुडे, शिरूर) आणि भरत शहाजी बांगर (वय ३६ रा. गणेगाव खालसा, शिरूर)अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी हितेंद्र बाळासाो जाधव (रा. वाघोशी, ता. फलटण, जि. सातारा) यानी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,  फिर्यादी व इतर ३ प्रवासी २ ऑगस्ट रोजी लातूर ते मुंबई या एस.टी.बसमधून सोलापूर ते पुणे हायवे रोडने प्रवास करीत असताना चार आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करून एस.टी.बसला गाडी आडवी मारून पास असणारे फिर्यादी व इतर ३ व्यक्ती यांना खाली घेवून त्यांना मारहाण व दमदाटी करून त्यांच्याकडील रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा एकुण १ कोटी १२ लाख ३६ हजार ८६० रुपये किमतीचा मुद्देमाल लुटून पोबारा केला होता.

सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस अधिक्षकानी स्थानिक गुन्हे शाखेला तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा याचा तपास करत होती. त्यावेळी हा गुन्हा वरुडे येथील गणेश भोसले आणि त्याचा भाऊ रामदास भोसले आणि इतर साथिदारांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शोध सुरु केला असता आरोपी हे खराडी बायपास येथून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने खराडी बायपास येथे सापळा रचून रामदास भोसले, तुषार तांबे, भरत बांगर यांना पकडले. आरोपीकडून काही रोकड हस्तगत करण्यात.आली. तसेच उर्वरीत मुद्देमाल ऊसाच्या शेतात लपवून ठेवल्याची सांगितले. आरोपीकडून एकूण ९२ लाख ८४ हजार ५४० रुपये तसेच स्विफ्ट कार, बुलेट मोटार सायकल, ज्युपिटर मोटार असा १ कोटी ५४ हजाराचा ऐवज हस्तगत केला आहे.

सदर गुन्हयातील आरोपी रामदास भाऊसाहेब भोसले याचा भरत शहाजी बांगर हा बहीणीचा पती आहे इतर आरोपी हे त्यांचे मित्र आहेत, सदर गुन्हयात आणखी आरोपीचा सहभाग आहे काय बाबत तपास सुरू आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.नि. भाऊसाहेब पाटील, यवत पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.