जम्मू कश्मीरच्या बडगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक ; एका दहशतवाद्याचा खात्मा

श्रीनगर: जम्मू कश्मीरच्या बडगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. खात्मा केलेल्या दहशतवाद्याकडून एक एके-४७ रायफल आणि एक पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. घटनास्थळी शोध सुरु आहे.

खरंतर, जम्मू काश्मीरमधील बडगामच्या मोचवा भागात काही दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती भारतीय सुरक्षा दलांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे भारतीय सुरक्षा दलांनं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं एक टीम तयार केली होती. या टीमने संबंधित परिसराला घेराव घातला होता. यानंतर सुरक्षा दलानं दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. पण सर्वबाजूने घेरलेलं पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात भारतीय सुरक्षा दलांनाही गोळीबार करावा लागला. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. मृत दहशतवाद्याकडून एक एके 47 रायफल,पिस्तूलसह शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. हा दहशतवादी काही दिवसांपूर्वीच दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता

गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलाला लक्ष्य करत ग्रेनेड हल्ले करण्यात येत आहेत. दहशतवाद्याकडून शुक्रवारी रात्री बनिहालमध्ये ग्रनेडहल्ला करण्यात आला. त्यात दोनजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गेल्या दोन दिवसातील ग्रेनेड हल्ल्याची ही तिसरी घटना आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.